Saturday, 11 September 2021

आयुष मंत्रालयाची "आयुष आपके द्वार" मोहीम..



🔰भारत सरकारच्या आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी) मंत्रालयाच्यावतीने 3 सप्‍टेंबर 2021 रोजी देशभरातील 45 हून अधिक ठिकाणांहून "आयुष आपके द्वार" या नावाने एक राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे.


🔰एका वर्षात देशभरातील 75 लाख कुटुंबांना औषधी वनस्पतींची रोपे वितरित करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. औषधी वनस्पतींमध्ये तेजपत्ता, स्टीव्हिया, अशोक, जटामांसी, गुळवेल/गुडुची, अश्वगंधा, कुमारी, शतावरी, लेमनग्रास, गुग्गुळ, तुळस, सर्पगंधा, कलमेघ, ब्राह्मी आणि आवळा यांचा समावेश आहे.


🔴ठळक बाबी..


🔰आयुष विभागाचे राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई यांनी कर्मचाऱ्यांना औषधी वनस्पतीच्या रोपट्यांचे वाटप करून नवी दिल्लीतील आयुष भवनातून मोहिमेचा शुभारंभ केला. उद्घाटनपर समारंभात एकूण 21 राज्ये सहभागी होत असून 2 लक्षाहून अधिक रोपे वितरित केली गेली.

केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतून या मोहिमेचा प्रारंभ केला. सोनोवाल यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला होता.


🔰आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय मोहिमेचा हा एक भाग होता. या प्रसंगी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB) आणि आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र (CCRA), आयुष मंत्रालय देखील या कार्यक्रमाचा भाग होते. NMPB संस्थेने औषधी रोपांचे वितरण केले आणि CCRA संस्थेने आयुर्वेदिक औषधांचे नागरिकांमध्ये वाटप केले.

No comments:

Post a Comment