२९ सप्टेंबर २०२१

हवेत अचुक लक्ष्यभेद करणाऱ्या ‘आकाश प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.



🔰डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने जमीनीवरुन हवेत मारा करत लक्ष्यभेद करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राच्या सुधारीत आवृत्तीची ‘आकाश प्राईम’ ची यशस्वी चाचणी आज घेतली. ओडिशातील चांदीपुर इथल्या एकात्मित चाचणी तळावरुन ही चाचणी घेण्यात आली. सुरुवातीला विकसित करण्यात आलेल्या आकाश क्षेपणास्त्राच्या तुलनेत नव्या दमाच्या आकाश प्राईममध्ये स्वदेशी उपकरणांचा जास्त वापर करण्यात आला आहे. 


🔰आकाश प्राईममध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणखी अचुकतेने ग्रहण करणारी स्वदेशी बनावटीची यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसंच उंचावर गेल्यावर थंड हवेतही खात्रीशीर काम करु शकेल अशा पद्धतीच्या सुधारणा या आकाश प्राईममध्ये करण्यात आल्या आहेत. आकाश प्राईमची चाचणी करतांना जमिनीवरील आवश्यक पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्वांमुळे जमीनीवरुन हवेतील लक्ष्यभेद करण्याची भारताची संरक्षण प्रणाली आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. 


🔰३० किलोमीटरच्या परिघातील जमिनीपासून २० किलोमीटर उंचीपर्यंतचे लक्ष्य अचूक भेदण्याची आकाश क्षेपणास्त्राची मूळ क्षमता आहे. ध्वनीपेक्षा ३ पट वेगाने आकाश क्षेपणस्त्र लक्ष्यभेद करु शकते. तेव्हा आकाश प्राईमच्या रुपात आकाश क्षेपणास्त्रात आणखी अचूकता आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...