🔰राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच आपत्कालीन लँडिंग सुविधा स्थापन करण्यात आली आहे. 09 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले.
🔴ठळक बाबी...
🔰आणीबाणीच्या स्थितीत भारतीय हवाई दलाची विमाने उतरविण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी उभारण्यात आलेले हे आपत्कालीन लँडिंग स्टेशन राजस्थानच्या बाडमेर येथे ‘राष्ट्रीय महामार्ग-925A’ यावर बांधण्यात आले आहे.महामार्गावर विमानांसाठी योग्य अशी 3.5 किलोमीटरची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.
🔰तयाची निर्मिती भारतमाला योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे.
हा बाडमेर (राजस्थान) येथील दोन नव्याने बांधलेल्या सट्टा-गंधव आणि गगारिया-बखसर विभागांच्या बांधकामाचा भाग आहे.
No comments:
Post a Comment