🍂अलीकडेच अफगाणिस्तानवर ताबा मिळविलेल्या तालिबान या दहशतवादी गटाचे प्रतिनिधी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतार देशाची राजधानी दोहा येथे प्रत्यक्ष बैठक झाली.
🍂भारताचे राजदूत दिपक मित्तल यांची दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई यांच्यासोबत ही बैठक झाली. चर्चा सकारात्मक झाल्याचे केंद्रीय विदेश कार्ये मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
🍂बठकीत अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. तसेच अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तालिबानसोबत चर्चा झाली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होण्याच्या शक्यतेचा मुद्दा भारताने चर्चेत उपस्थित केला.
🌻पार्श्वभूमी..
🍂ऑगस्ट 2021 या महिन्यात तालिबान या दहशतवादी गटाने अफगाणिस्तान देशावर आपला ताबा मिळवला. तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळविताच भारताने “ऑपरेशन देवी शक्ती” या बचाव मोहीमेच्या अंतर्गत दुसऱ्या दिवशीपासून विमानांद्वारे भारतीयांना सुरक्षित मायदेशात परत आणत आहे. या मोहिमेसाठी कार्यात भारतीय हवाई दलाची आणि एअर इंडिया या विमानसेवा कंपनीची विमाने अखंडपणे कार्य करीत आहे.
🌻अफगाणिस्तान देश..
🍂अफगाणिस्तान हा नैर्ऋत आशियातील भूमिवेष्टित देश आहे. देशाच्या उत्तरेस रशिया, ईशान्येस चीन, पूर्वेस भारत व पाकिस्तान, दक्षिणेस पाकिस्तान व पश्चिमेस इराण हे देश आहेत. काबूल हे राजधानीचे शहर असून मझर-इ-शरीफ, कंदाहार ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. ‘अफगाणी’ हे तेथील चलनी नाणे आहे.
No comments:
Post a Comment