Wednesday, 29 September 2021

अ‍ॅमेझॉन ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनी.



🎬ऑनलाइन व्यापारातील महाकाय कंपनी अमेझॉन ही दुसरी ‘इस्ट इंडिया कंपनी’च आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ या नियतकालिकातील मुख्य लेखात करण्यात आला आहे. ‘इस्ट इंडिया कंपनी २.०’ असे या लेखाचे शीर्षक आहे.


🎬‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी सोमवारी या नियतकालिकाच्या आगामी अंकाचे मुखपृष्ठ ट्वीटरवर प्रसारित केले. मुखपृष्ठावर अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचे छायाचित्रही आहे. ‘पांचजन्य’च्या ३ ऑक्टोबरला बाजारात येणाऱ्या अंकात अ‍ॅमेझॉनवर कडाडून टीका करणारी ‘मुखपृष्ठ कथा’ करण्यात आली आहे. त्यात या कंपनीचे वर्णन ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असे करण्यात आले आहे. ‘भारतावर कब्जा मिळवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात जे केले, तेच अ‍ॅमेझॉनच्या कृतींमधून दिसून येते,’ असे या लेखात नमूद केले आहे.


🎬‘अ‍ॅमेझॉन’ने सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी फार मोठी रक्कम वापरल्याचे उघड केल्याचे ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी ‘आयएएनस’ या वृत्तसंस्थेला सांगितले. आपल्या कुठल्या चुकीच्या गोष्टीमुळे लाच देण्याची गरज भासते असा प्रश्न अ‍ॅमेझॉनला विचारायला हवा, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment