Tuesday, 21 March 2023

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ?

 देशांतर्गत संस्था व व्यक्तींनी एका आर्थिक वर्षात मिळवलेले उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न हे तीन पद्धतीने मोजली जाते.


1) उत्पन्न पद्धत (income method)

2) उत्पादन पद्धत (product method)

3)  खर्च पद्धत (expenditure method)


 1) उत्पन्न पद्धत(income method) –

    या पद्धतीत उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणार्‍या घटक उत्पन्नाच्या आधारावर केली जाते.वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, उद्योग, कौशल्य वापरले जाते.त्यांच्या मालकांना उत्पन्न म्हणजे खंड, मजुरी, व्याज व नफा प्राप्त होतो. याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे उत्पन्न पद्धत म्हणतात.  उत्पन्न पद्धतीत घटक किंमत विचारात घेतली जाते.


 2) उत्पादन पद्धत (product method) –

       या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज करून काढली जाते. उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते.


 3) खर्च पद्धत(expenditure method) –

           राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीने ही करता येते. अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. यासाठी उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च यांची बेरीज केले जाते.  उपभोग खर्च खाजगी आणि सरकारी अशा प्रकारचा असतो.  गुंतवणूक खर्च देशातील आणि परदेशातील असा दोन प्रकारचा असतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...