🔰कद्राने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सूचित केले की, करोनाबाधित आढळणाऱ्या व्यक्तीने 30 दिवसांच्या आत आत्महत्या केल्यास त्यास करोनामृत्यूच ठरवले जाईल. यामुळे मृताच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत मिळणार आहे.
🔰करोनामृत्यू कशास म्हणावे याबद्दलच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सरकारने म्हटले होते की करोना संसर्गादरम्यान विषबाधा, आत्महत्या, हत्या, अपघात इत्यादीमुळे झालेल्या मृत्यूला करोनामृत्यू मानले जाणार नाही. न्यायालयाने सरकारला या अटीवर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.
🔰गरुवारी, सर्वोच्च न्यायालयाने महामारीला बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत निधी निश्चित केल्याबद्दल सरकारने आनंद व्यक्त केला. “आज आम्ही खूप आनंदी आहोत. ज्या लोकांना त्रास झाला आहे त्यांच्यासाठी हे सांत्वन ठरेल. सरकार करत असलेली प्रत्येक गोष्ट ज्यांना त्रास झाला त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आहे. त्यांच्यासाठी काहीतरी केले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे.
🔰भारताने जे केले ते इतर कोणताही देश करू शकला नाही याची आम्हाला न्यायालयीन दखल घ्यावी लागेल, ”अशी टिप्पणी न्यायमूर्ती शाह, न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने केली आहे.
No comments:
Post a Comment