Wednesday, 22 September 2021

ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’



💫भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या परिचारिका सेवेचे उपमहासंचालिका ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले.


💫राष्ट्रपती श्री  राम नाथ कोविंद यांनी एका आभासी समारंभात ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती सहीत एकूण 51 परिचारिकांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ प्रदान केला आहे.


☄️पार्श्वभूमी..


💫1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातल्या जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्‍म 12 मे 1820) यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश वंशाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका मानले जाते.


💫फलोरेन्स नायटिंगेल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करीत असत. रात्री हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे.


💫1965 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद (इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेस -ICN) तर्फे पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता. 1974 साली 12 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ पाळण्याची घोषणा केली गेली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...