२५ सप्टेंबर २०२१

उज्ज्वला 2.0” योजना



🔰19 सप्टेंबर 2021 रोजी मध्य प्रदेश राज्यात “उज्ज्वला 2.0” (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जबलपूरमध्ये आयोजित केलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जवळपास 5 लक्ष महिलांना मोफत स्वयंपाकाचा गॅसच्या (LPG) जोडण्या देवून शुभारंभ करण्यात आला.


❄️उज्ज्वला 2.0 योजनेचे वैशिष्ट्य


🔰खड्यातून अनेकजण कामासाठी शहरात स्थलांतरीत होतात. तिथे त्यांना अधिवासाचा पुरावा दाखवण्याबाबतच्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता कामगारांना अधिवासाचा पुरावा सिद्ध करण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नाही. गॅस जोडणी मिळवण्यासाठी त्यांना फक्त आपल्या पत्त्याबाबत स्वघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.


❄️परधानमंत्री उज्ज्वला योजना


🔰परधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना पुढील 3 वर्षांत प्रत्येक जोडणीसाठी 1600 रुपये इतका आधार निधी देऊन 5 कोटी LPG जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...