Saturday, 11 September 2021

13 वी BRICS शिखर परिषद.



🌺2021 या वर्षी BRICS समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आभासी स्वरूपातील 13 व्या BRICS शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.


🌺शिखर परिषदेची संकल्पना - BRICS@15 : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-BRICS सहकार्य (BRICS@15: Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus)


🎗ठळक बाबी...


🌺बठकीला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित राहणार आहेत.


🌺आपल्या अध्यक्षतेच्या काळासाठी भारताने चार प्राधान्यक्षेत्रांची रूपरेषा मांडली होती. त्यात बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा, दहशतवाद विरोध, एसडीजी शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे आणि व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी अदलाबदल कार्यक्रम या बाबींचा समावेश आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त कोविड-19 महामारीच्या प्रभावावर आणि सध्याच्या अन्य जागतिक समस्यांवर देखील विचारांची देवाण-घेवाण देखील करण्यात येणार आहे.

यापूर्वी BRICS समूहाच्या भारतीय अध्यक्षपदाच्या दरम्यान BRICS समूहाचा पंधरावा वर्धापनदिन आहे.


🎗BRICS समूहाविषयी..


🌺BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.


🌺रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...