Friday, 16 June 2023

लोकअंदाज समिती (Estimates Committees)

√ या समितीला प्राक्कलन समिती  असेही म्हणतात. 


√ या समितीचा उगम १९२१ मध्ये स्थापन  करण्यात आलेल्या स्थायी वित्तीय  समितीच्या स्वरूपात झाला. 


√ स्वातंत्र्यानंतर तत्कालीन वित्त मंत्री  जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार  १९५० मध्ये लोकअंदाज समिती  स्थापन करण्यात आली.


√ सुरूवातीला या समितीमध्ये २५ सदस्य असत, १९५६ मध्ये सदस्यसंख्या ३०   इतकी वाढविण्यात आली.


●रचना :


√ लोकअंदाज समितीमध्ये एकूण ३० सदस्य असतात.


√ ते सर्व लोकसभेकडून आपल्या  सदस्यांमधून निवडून दिले जातात.


√ राज्यसभेच्या सदस्यांना या समितीवर    प्रतिनिधीत्व दिले जात नाही. 


√ सदस्यांची निवडणूक एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व  पद्धतीद्वारे केली जाते, ज्यामुळे लोकसभेतील सर्व पक्षांना प्रतिनिधीत्व  मिळू शकते.


√ मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही.


√ लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून  एकाची नेमणूक समितीचा अध्यक्ष  म्हणून करतात. 


√ तो नेहमी सरकारी पक्षातीलच असतो.


●कार्ये :


√ लोकअंदाज समितीचे प्रमुख कार्य  अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजांची तपासणी करून सार्वजनिक खर्चात मितव्ययिता सुचविणे हे असते. 


√ त्यामुळे या समितीला सतत मितव्ययिता समिती (Continuous Economy Committee) असे  म्हणतात.


●समितीची कार्ये पुढीलप्रमाणे सांगता  येतील:


१) अर्थसंकल्पीय अंदाजांच्या मुळाशी  असलेल्या रकमेची तरतूद या धोरणांच्या मर्यादेतच राहून धोरणाला अनुरूप कोणती काटकसर, संस्थात्मक सुधारणा, कार्यक्षमता व  प्रशासकीय सुधारणा करता येतील, यासंबंधी अहवाल देणे.


२) प्रशासनात कार्यक्षमता व मितव्ययिता आणण्यासाठी पर्यायी धोरणे सुचविणे.रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे  की नाही याचे परीक्षण करणे.


४) अर्थसंकल्पीय अंदाज संसदेला  कोणत्या स्वरूपात सादर करावे,  याबाबत सल्ला देणे.

 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...