Sunday, 8 August 2021

पंजाबमध्ये सर्व शाळा सुरू.



पंजाबमध्ये सोमवारी सर्व वर्गाच्या शाळा काही महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाल्या असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त होती. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. राज्य सरकारने शनिवारी २ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती.   रुग्णांची संख्या कमी होत असल्याने करोना निर्बंध शिथिल केले होते.


करोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जाणार असून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून लेखी संमती घेतली जाणार आहे. शाळांची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ अशी असणार आहे.  


सोमवारी राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पूर्व प्राथमिक शाळा व पहिली दुसरीचे वर्ग मार्च २०२० नंतर १० महिन्यांनी सुरू झाले आहेत. सर्व शाळा दोन ऑगस्टपासून सुरू करण्याच्या आदेशापूर्वी २६ जुलैला दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. जी मुले शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग उपलब्ध असणार आहेत.


डॉक्टर्स व शिक्षण तज्ज्ञ यांच्या कोणत्या अहवालानुसार सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते व आप नेते हरपाल सिंह चिमा यांनी केला आहे.  राज्यात ६०.५ लाख विद्यार्थी असून एकूण २० टक्के लोकसंख्येचा जीव धोक्यात टाकला जात आहे असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...