Saturday, 21 August 2021

तालिबानचे महिलांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

 


🔰तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले आहे. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी  व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली असून काल अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी लोकांनी विमानतळावर गर्दी केली होती.


🔰तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इनामुल्ला समनगानी यांनी देशातील संघराज्य प्रशासनाच्या  पातळीवरून प्रथमच भाष्य केले.  काबूलमध्ये हिंसाचाराच्या कुठल्याही घटना झाल्या नसून लोक घरात बसले आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून तालिबानने तुरुंगातील कैद्यांना मुक्त केले असून शस्त्रागारे लुटली आहेत.


🔰समनगानी यांनी सांगितले की, इस्लामी अमिरात महिलांना लक्ष्य करू इच्छित नाही. उलट त्यांनी शरिया कायद्यानुसार सरकारमध्ये सामील व्हावे. सरकार कसे असेल याची अजून निश्चिाती झालेली नाही. पण पूर्णपणे इस्लामी नेतृत्व राहील, सर्वांनी या सरकारमध्ये सहभागी व्हावे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...