०२ ऑगस्ट २०२१

चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत - जितेंद्र सिंह.



🔰चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले. करोना साथीमुळे या मोहिमेची गती मंदावली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


🔰लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अवकाश खात्याचे राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी म्हटले आहे की, चांद्रयान ३ मोहिमेचे वेळापत्रक बदलावे लागत आहे. चांद्रयान ३ मोहिमेत अनेक प्रक्रिया असून त्यात अनेक उपप्रणाली, त्यांची जोडणी व तपासणी असे अनेक मुद्दे आहेत. या प्रकल्पाची प्रक्रिया करोनामुळे लांबली असून घरून जे काम करता येणे शक्य आहे तेवढे टाळेबंदीच्या काळात पूर्ण झाले आहे.


🔰चांद्रयान ३ मोहीम अमलात आणण्यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर पुन्हा काम सुरू होईल व ही मोहीम तरीही प्रगतिपथावर आहे. यापूर्वी भारताने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सोडले होते. जिथे कुठल्याही देशाने तोपर्यंत यान पाठवले नव्हते. भारताच्या शक्तिशाली प्रक्षेपकाच्या मदतीने ते यान सोडण्यात आले होते. त्या वेळी ७ सप्टेंबर २०१९ रोजी विक्रम या लँडरचे आघाती अवतरण झाल्याने भारताला चंद्रावर गाडी उतरवण्यात अपयश आले होते.


🔰अन्यथा पहिल्याच प्रयत्नात गाडी तेथे उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असता. चांद्रयान ३ मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोसाठी महत्त्वाची असून त्यात आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भारताच्या कामगिरीस बळ मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...