Sunday, 22 January 2023

महत्त्वाच्या दऱ्या :


 काश्मीर दरी- पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रूंदी सुमारे ८० किमी इतकी आहे. 


कांग्रा दरी- हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे. 


कुलू दरी- रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.


काठमांडू दरी –  नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.

शिवालिक रांगा / बाह्य हिमालय – हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग ही शिवालिक रांग आहे. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला. येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच डून (Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू-काश्मीर), शिवालिक रांगाच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.


हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण


 बुरार्ड यांच्या मते हिमालयाचे वर्गीकरण खालील प्रकारे करण्यात आले आहे – १. पंजाब हिमालय २. कुमाऊँ हिमालय ३. नेपाळ हिमालय ४. आसाम हिमालय. 

पंजाब हिमालय- सिंधू आणि सतलज नदी दरम्यान पंजाब हिमालयाचा भाग असून याची लांबी ५६० किमी इतकी आहे.

 

कुमाँऊ हिमालय – सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यान कुमाँऊ हिमालयाचा भाग असून याची लांबी ३२० किमी इतकी आहे. 


नेपाळ हिमालय – काली नदी आणि तिस्ता नदी यांदरम्यान नेपाळ हिमालयाचा भाग असून याची लांबी ८०० किमी इतकी आहे.

आसाम हिमालय – तिस्ता नदी आणि दिहांग नदी यांच्यादरम्यान आसाम हिमालयाचा भाग असून यांची लांबी ७२० किमी इतकी आहे.


पूर्वाचल – पूर्वेकडे दिहांग घळई ओलांडल्यानंतर हिमालय पर्वतरांगा दक्षिणेकडे वक्राकार गतीने वळलेल्या दिसतात. उत्तर दक्षिणेकडे जाताना यांमुळे टेकडय़ांची एक मालिकाच तयार झाली आहे. यामध्ये पुढील उपविभागांचा समावेश होतो – पूर्व-नेफा, नागा रांगा, मणिपूर टेकडय़ा, उत्तर केचर टेकडय़ा, मिझो टेकडय़ा, त्रिपुरा टेकडय़ा.


पूर्व-नेफा: यांमध्ये मिश्मी टेकडय़ा आणि पतकोई रांगा यांचा समावेश होतो.

मिश्मी टेकडय़ा: मिश्मी टेकडय़ांमध्ये पूर्वाचलमधील सर्वात उंच रांगांचा समावेश होतो. येथील अनेक शिखरांची उंची ४५०० मी. पेक्षा अधिक आहे.


नागा रांगा: नागालँड आणि म्यानमार यांदरम्यान, नागा रांगा या जलविभाजक म्हणून कार्य करतात. नागा रांगांच्या पश्चिमेला कोहिमा टेकडय़ा आहेत.


मणिपूर टेकडय़ा: भारत आणि म्यानमारच्या सरहद्दीला लागून मणिपूर टेकडय़ा आहेत. मणिपूर टेकडय़ांमध्ये लोकटॅक  सरोवर आहे. लोकटॅक सरोवरात अभिकेंद्री नदीप्रणाली (Centripetal Drainage) आढळून येते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...