Sunday, 17 March 2024

घटना निर्मिती मधील काही महत्त्वाचे मुद्दे पाठ कराच खुप महत्त्वाचे मुद्दे

1. 1922 मध्ये महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधानसभा असा शब्दोउल्लेख न करता अशा सभेची मागणी केली.


2. 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले आहे .


3.डिसेंबर 1934 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली.


4. 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्यावतीने मागणी केली की ,स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेत द्वारे कोणत्याही बाह्यप्रभावाविना तयार करण्यात यावी.


4. 1940 च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफर द्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य केले .


5.1942 च्या सर क्रिप्स यांच्या तरतुदींमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य करण्यात आले.


6. शेवटी मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लान मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.


7. 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता संविधान सभेची पहिली बैठक ठरली.


8.फ्रान्सच्या पद्धतीचे अनुकरण करून ज्येष्ठ सदस्य असलेल्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.


9. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.


10. BN राव यांची नेमणूक व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून केली .


11.13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेचा उद्देश पत्रिका मांडली .


12.22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला. 


13. 25 जानेवारी 1947 रोजी हरेन्‍द्र कुमार मुखर्जी यांची संविधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली हरेन्‍द्र कुमार मुखर्जी एक भारतीय ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधी होते.


14. 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंट बॅटन योजनेच्या आधारे 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वतंत्र कायदा 1947 ला 18 जुलै 1947 रोजी राजसत्तेची मान्यता मिळाली .


15.या कायद्याने भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण करण्यात येऊन त्यांना आपली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आली.


16. 28 एप्रिल 1947 रोजी सहा संस्थानिकांच्या म्हणजे बडोदा बिकानेर ,जयपुर ,पटियाला ,रेवा आणि उदयपूर प्रतिनिधींनी संविधानसभेत प्रवेश केला होता .


17.भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 विधानसभेच्या बाबतीत पुढील तीन बदल झाले तर संविधान सभेला पूर्ण सार्वभौम बनवण्यात आले दुसरे  कायदेमंडळाच्या दर्जा प्राप्त झाला.


18. संविधान सभेचे सदस्य संख्या 299 इतके झाली त्यापैकी 229 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते त्यापैकी सर्वाधिक प्रतिनिधी संयुक्तप्रांत 55 ,बिहार (36) आणि बॉम्बे(21) या प्रांताचे होते. संस्थांनापैकी सर्वाधिक प्रतिनिधी म्हैसूर(7) & त्रावणकोर (6) या संस्थानाचे होते.


19. नवीन नियमानुसार 16 जुलै 1947 रोजी पुन्हा दोन उपाध्यक्षांची निवड करण्यात आली एच सी मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी.


20.मे 1949 मध्ये संविधानसभेने भारताच्या राष्ट्र कुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले. 


21.22 जुलै 1947 रोजी सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वजाची स्वीकार केला .


22.24 जानेवारी 1950 रोजी सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...