Saturday, 21 August 2021

अफगाणी नागरिकांसाठी भारताचा आपत्कालीन इ-व्हिसा



🔰अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन इ-व्हिसा जारी करण्याचे भारताने मंगळवारी जाहीर केले आहे.


🔰अफगाणिस्तानचे कुठल्याही धर्माचे नागरिक इ आपत्कालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्या अर्जांवर नवी दिल्ली येथे प्रक्रिया केली जाईल. तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने ही घोषणा केली आहे. गृह कामकाज खात्याने अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहून इलेक्ट्रॉनिक व्हिसाची सुरुवात केली आहे, त्याला इ इमर्जन्सी व्हिसा असे संबोधण्यात येत आहे. यात जे ऑनलाइन अर्ज येतील त्यावर तातडीने प्रक्रिया करून संबंधित नागरिकांना भारतात येण्यास परवानगी दिली जाईल असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.


🔰अधिकाऱ्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद असल्याने ऑनलाइन व्हिसा अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यावर दिल्लीत प्रक्रिया करण्यात येईल. हा व्हिसा सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असणार आहे. सुरक्षा बाबींचा विचार  अर्ज मंजूर करताना केला जाणार आहे, त्यानंतरच अफगाणी नागरिकांना प्रवेश दिला जाईल. सर्व धर्माचे अफगाणी नागरिक या व्हिसासाठी अर्ज करू शकणार आहेत. शेकडो अफगाणी लोक काबूलमध्ये मुख्य विमानतळावर आले होते व त्यांनी लष्कराच्या जेट विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...