१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?
अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३
२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?
अ ) ९०,००० ब ) ९८, ९९९ क) ९,००० ड ) ९०,००१
३) राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?
अ ) ४,५०० ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००
४) १०.५ + १.०५ + १०५ = ?
अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५
५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ?
अ ) ११६ ब ) ५६ क ) १७६ ड ) २३६
६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ?
अ ) २ ब ) ५ क ) ९ ड ) १५
--- --- --- ---
७ ८ १२ १८
७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ?
अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१
८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००
९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?
अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही
१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?
अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २०
उत्तर : १- ड २- ब ३- क ४-अ ५- अ ६-ड ७-अ ८- अ ९- ब १०-ब
No comments:
Post a Comment