Monday, 2 August 2021

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बोम्मई यांचा शपथविधी



🔰कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांचा शपथविधी बुधवारी येथे झाला असून तेथील राजकीय अस्थिरतेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. येडियुरप्पा पक्षाच्या आदेशानुसार पायउतार झाल्यानंतर बोम्मई यांच्या नावाची घोषणा भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी केली होती. त्यानुसार बोम्मई यांनी बुधवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.


🔰कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत बोम्मई यांची नेतेपदी निवड केली होती. बोम्मई हे उत्तर कर्नाटकातील लिंगायत नेते असून येडियुरप्पा यांचे विश्वासू मानले जातात, त्यामुळे यापुढेही कर्नाटकच्या राजकारणावर येडियुरप्पा यांचा प्रभाव राहील असे सांगण्यात येते. बोम्मई हे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.आर बोम्मई यांचे पुत्र असून येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात ते गृह कामकाज, कायदा, विधिमंडळ कामकाज या खात्याचे मंत्री होते. आता येडियुरप्पा यांचे मंत्रिमंडळ विसर्जित झाले असून बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली नवे मंत्रिमंडळ सत्तारुढ होत आहे.


🔰कर्नाटकात पिता-पुत्र जोडीने मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एच.डी. देवेगौडा तसेच एच.डी. कुमार स्वामी या पिता-पुत्रांनी मुख्यमंत्री पद सांभाळले होते. बोम्मई हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हावेरी जिल्ह्य़ातील शिगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व ते करतात.

No comments:

Post a Comment