Monday, 29 November 2021

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग

👉स्थापना : १३ ऑगस्ट १९९३
👉मुख्यालय : दिल्ली 
👉रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य
👉कार्यकाळ : ३ वर्षे

▪️अध्यक्ष व सदस्य पात्रता 
👉अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असायला पाहिजे
१ सदस्य सचिव असतील
१ सदस्य समाज शास्त्रज्ञ असतील
२ सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असतील

▪️स्थापना
मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने झाली. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली.

▪️इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. त्यांनतर भारत सरकारने १९९३ साली राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन केला.

▪️कार्य
OBC घटकांच्या तक्रारी सोडविणे, एखाद्या जातीला OBC घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे. तसेच एखाद्या जातीला OBC घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...