Sunday, 30 July 2023

सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण :

निरनिराळ्या अर्थशास्‍त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण केलेले आहे. 

सार्वजनिक खर्चांचे काही महत्‍त्‍वपूर्ण प्रकार आता बघुयात ..

 

अ) महसुली खर्च : 

महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्‍यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च  नियमितपणे उद्भवतो. 

उदा :-  

शासनाचा प्रशासकीय खर्च, 

शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्‍ते, निवृत्‍ती वेतन, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्‍यांचा खर्च इत्‍यादी.

 

ब) भांडवली खर्च : 

भांडवली खर्च म्‍हणजे देशाच्या वृदध् ी व  विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय. 

उदा :-

विविध विकास प्रकल्‍पांतील मोठ्या गुंतवणूका, शासकीय कर्जाची परतफेड, राज्‍य शासन व शासकीय कंपन्यांना 

दिलेले कर्ज इत्‍यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत. 

 

क) विकासात्‍मक खर्च :

विकासात्‍मक खर्च हा उत्‍पादक 

स्‍वरूपाचा असतो. ज्‍या खर्चामुळे रोजगार निर्मिती,उत्‍पादन वाढ, किंमतस्‍थेैर्य इत्‍यादी बदल घडून वाढ होते. त्‍याला 

विकासात्‍मक खर्च असे म्‍हणतात. 

उदा :-  

आरोग्‍य शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्‍याण, संशोधन आणि विकास यांवरील खर्च इत्‍यादी.

 

 ड) विकासेतर खर्च : 

शासनाच्या ज्‍या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्‍यक्ष उत्‍पादक परिणाम होत नाही, त्‍याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असे म्‍हणतात. 

उदा :- 

प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च इत्‍यादी हे खर्च  अनुत्‍पादक स्‍वरुपाचे असतात.


No comments:

Post a Comment