Saturday, 21 August 2021

अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी-७ देशांची बैठकमी.


🔰अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या परिस्थितीवर जी ७ देशांची आभासी बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ठरवले आहे. बायडेन व जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली.


🔰लष्कराचे शौर्य व व्यावसायिकता याची प्रशंसा करून त्यांनी म्हटले आहे की, काबूलमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराने मदत केली. अफगाणिस्तानबाबतचे धोरण पुढे नेण्यासाठी जागतिक समुदायासह सर्व मित्र देशात समन्वय असण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. मानवतावादी पातळीवर अफगाणी लोकांना मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानातील घडामोडींवर संयुक्त धोरण ठरवण्यासाठी जी ७ देशांची बैठक घेण्याचे ठरवले आहे.


🔰जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे अफगाणिस्तानातील परिस्थितीवर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत.


🔰तयांनी कतारचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री महंमद अब्दुलरहमान अल थानी व कुवेतचे परराष्ट्र मंत्री शेख अहमद नासेर अल महंमद अल सबाह यांना दूरध्वनी करून अमेरिकी लोक तसेच तेथील दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित परतीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले आहेत, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिली. यापुढेही संपर्कात राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. रविवारी अफगाणिस्तानात तालिबानने काबूल जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. त्यावेळी अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून गेले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...