🔰मळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.
🔰‘डेल्टा’मुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या अनुषंगाने स्पष्ट संदेश प्रसारित करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची सक्ती आणि मुखपट्टीचा वापर या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता ‘सीडीसी’ने अधोरेखित केली आहे.
🔰करोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार प्रथम भारतात आढळला आणि आता त्याचा फैलाव जगभरात झाल्याचे ‘सीडीसी’च्या अंतर्गत अहवालामध्ये म्हटले आहे. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे वेगाने पसरतो. तसेच सर्दीच्या विषाणूपेक्षाही त्याचा प्रादुर्भाव वेगाने होतो, असेही ‘सीडीसी’ने नमूद केले आहे.
🔰‘इम्प्रुव्हिंग कम्युनिकेशन्स अराऊंड व्हॅक्सिन ब्रेकथ्रू अँड व्हॅक्सिन इफेक्टिव्हनेस’ या अहवालात ‘डेल्टा’च्या धोक्याबद्दल इशारा देण्यात आला आहे. डेल्टाचा सामना करण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागणार आहेत. त्याचा धोका लोकांना समजून सांगावा लागणार आहे.
No comments:
Post a Comment