Wednesday, 14 July 2021

भारतीय रिझर्व्ह बँकेची 'RBI रिटेल डायरेक्ट' योजना..



🩸सरकारी कर्जरोख्यांमध्ये किरकोळ सहभाग वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे गुंतवणूकदारांचे “गिल्ट सिक्युरिटीज अकाऊंट” ('रिटेल डायरेक्ट') उघडण्याच्या सुविधेसह सरकारी कर्जरोख्यांच्या बाजारपेठेमध्ये (प्राथमिक व माध्यमिक असे दोनही) ऑनलाईन प्रवेशाद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑनलाइन प्रवेशात सुधारणा करण्यासाठी 'RBI रिटेल डायरेक्ट' सुविधा जाहीर करण्यात आली आहे.


🧬योजनेची वैशिष्ट्ये....


🩸किरकोळ गुंतवणूकदारांना (व्यक्ती) RBI याकडे ‘रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाउंट’ (RDG खाता) उघडण्याची आणि व्यवस्थापित करण्याची सुविधा असेल.योजनेच्या उद्देशाने तयार केलेल्या ‘ऑनलाईन संकेतस्थळाच्या’ माध्यमातून RDG खाते उघडता येते.


🩸‘ऑनलाइन संकेतस्थळ’ नोंदणीकृत वापरकर्त्यांना पुढे नमूद सुविधा देखील प्रदान करणार - सरकारी कर्जरोख्यांच्या प्राथमिक वाटपासाठी प्रवेश; निगोशिएट डीलिंग सिस्टम-ऑर्डर मॅचिंग सिस्टम (NDS-OM) यामध्ये प्रवेश.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...