Friday, 16 July 2021

भूतान: QR सुविधेसाठी भारताची UPI मानके स्वीकारणारा प्रथम देश



🎍भारताचे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि भूतानचे वित्तमंत्री ल्योनपो नामग्ये त्शेरिंग यांनी 13 जुलै 2021 रोजी झालेल्या आभासी कार्यक्रमादरम्यान ‘भीम-UPI’ अॅपच्या भूतानमधील परिचालनाला संयुक्तपणे सुरुवात केली.


🎍कविक रिस्पॉन्स (QR) सुविधेसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रमाणकांचा स्वीकार करणारे तसेच भारताच्या भीम अ‍ॅप (भारत इंटरफेस फॉर मनी / BHIM) याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याची यंत्रणा स्वीकारणारे शेजारी राष्ट्रांपैकी भूतान हे पहिले राष्ट्र आहे.


🎍भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या रूपे कार्डच्या वापराला स्वीकृती देण्यात येऊन त्यांचा वापर यापूर्वीच सुरु झाला आहे.


🌀BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी) अॅप विषयी


🎍30 डिसेंबर 2016 रोजी ‘डिजी धन’ कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी)’ या मोबाइल देयक अॅपचे उद्घाटन झाले. ते युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) तंत्रावर आधारित देयके प्रदान करणारे एक मोबाइल अॅप आहे. ते खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. BHIM अॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे किंवा प्राप्त करणे, खात्यांची जोडणी, वापरकर्ताची माहिती जतन करणे, भाषा बदलणे, लाभार्थीच्या तपशीलाची नोंद ठेवणे आणि रकमेची चौकशी अश्या सुविधा देण्यात आल्या आहेत.


🎍गल्या 5 वर्षांत 10 कोटीपेक्षा जास्त UPI QR नोंदण्यात आले तसेच भीम-UPI अॅपच्या माध्यमातून 2020-21 या वर्षात 41 लक्ष कोटी रुपये एवढ्या मूल्याचे 22 अब्ज आर्थिक व्यवहार करण्यात आले. 


🌀भतान देश


🎍भतान हा दक्षिण आशियातील एक सार्वभौम राजेशाही राष्ट्र आहे. पूर्व हिमालयातील हे एक भूवेष्टीत राज्य असून याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस भारताचा अरूणाचल प्रदेश, दक्षिणेस आसाम व प. बंगाल आणि पश्चिमेस सिक्कीम तसेच तिबेटमधील चुंबी खोरे आहे. थिंफू ही देशाची उन्हाळी, तर पारो ही हिवाळी राजधानी आहे. ’एनगुलट्रम’ हे भूतानी चलन आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...