🔰युरोपमध्ये जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्याचं कारण म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी वापरल्या जात असलेल्या कोविशिल्ड लसीला युरोपियन युनियनने मंजुरीच दिलेली नाही.
🔰तयामुळे ग्रीन पास मिळणं कठिण झालं असून, भारतातून युरोपातील देशात जाण्यात समस्या निर्माण होणार आहेत. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकडे युरोपियन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने कोविशिल्ड लस ग्रीन पास यादीत नसण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.
🔰यरोपियन युनियनने ग्रीन पास पद्धती सुरू केली आहे. यात युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EMA) काही लसींना मंजुरी दिलेली आहे. मंजुरी दिलेली लस घेतलेल्या परदेशी प्रवाशांनाच युरोपमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारा ग्रीन पास दिला जाणार आहे. हा ग्रीन पास मिळाल्यानंतर ती व्यक्ती युरोपातील २७ देशांमध्ये जाऊ शकते.
🔰ही ग्रीन पास पद्धती १ जुलैपासून संपूर्ण युरोपात लागू केली जाणार आहे. तर स्पेन, जर्मनी, ग्रीस, पोलंड आदी देशांनी याची अमलबजाणी सुरू केली आहे. दरम्यान, ग्रीन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या यादीत भारतातील कोविशिल्ड लसीचा समावेशच केलेला नसल्यानं समस्या निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment