🔰भारताचे केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र व प्रभार) प्रह्लादसिंग पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 2 जुलै 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे BRICS देशांच्या संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक आयोजित करण्यात आली होती.
🔰बराझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या संस्कृती मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला होता. बैठकीत BRICS देशांतील मूर्त आणि अमूर्त वारशाच्या ज्ञानावर सांस्कृतिक अनुभवांची ऑनलाइन देवाणघेवाण करण्याच्या क्षेत्रामधील सहकार्यांवर मंत्र्यांनी भर दिला.
⭕️ठळक बाबी
🔰“संबंध आणि सुसंवाद सांस्कृतिक समन्वय” या संकल्पनेच्या अंतर्गत BRICS देशांमधील सांस्कृतिक उपक्रमांच्या प्रगतीसाठी आणि विस्तारासाठी चर्चा झाली.
🔰समतोल आंतरराष्ट्रीय मानवतावादी संवाद स्थापित करण्यासाठी संस्कृतीच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले गेले. देशांकडील हस्तलिखितांमध्ये असलेल्या माहितीच्या अमूल्य खजिन्याचा उपयोग करण्याच्या उद्देशाने, प्राचीन हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि डिजिटलीकरण क्षेत्रात BRICS आघाडी स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला.
No comments:
Post a Comment