Thursday, 8 July 2021

हेलिअम



🅾️१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ ‘पीअर जॅनसन’ हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतात आले. सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या वर्णपटात (सूर्यकिरण लोलकातून जाऊ दिले असता, बाहेर पडताना सप्तरंगी वर्णपट पाहायला मिळतो) एक पिवळ्या रंगाची रेषा त्यांना आढळली. सूर्यग्रहण नसतानाही निरीक्षण केले असता सूर्याच्या वर्णपटात पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसला. सोडिअम या मूलद्रव्याचे ज्वलन झाले असता, त्याची ज्वाला पिवळ्या रंगाची दिसते. पण ‘पीअर जॅनसन’ यांना सूर्याच्या वर्णपटात दिसलेला पिवळा रंग सोडिअम या मूलद्रव्याच्या पिवळ्या रंगापेक्षा वेगळा आढळला. त्याच वर्षी जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड यांनाही सूर्याच्या वर्णपटात हा पिवळा रंग आढळला. आणि तो सूर्यात असणाऱ्या मूलद्रव्याचा आहे असा शोध लागला. या रंगाची तरंगलांबी ५८७.४९ नॅनोमीटर म्हणजेच ०.००००००५८७४९ मीटर होती. जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड या दोघांनीही या मूलद्रव्यास सूर्याला ग्रीक भाषेत असलेल्या हेलिओज (helios) या नावावरून हेलिअम असे नाव दिले. पृथ्वीवर सापडण्याआधी पृथ्वीबाहेर सापडलेले हे पहिलेच मूलद्रव्य. भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे हेलिअमचा शोध ‘पीअर जॅनसन’ यांना भारतातून लागला.


🅾️सर्यावर आढळलेले हे मूलद्रव्य दोन वर्षांनंतर, लुईंगी पामित्री या भौतिकतज्ज्ञाला इटली देशातील ‘व्हेसुव्हिअस’ पर्वताच्या ज्वालारसात आढळले. १८९५ मध्ये रसायन शास्त्रज्ञ सर विल्यम रामसे यांनाही पृथ्वीवर हेलिअमच्या अस्तित्वाचा शोध लागला.


🅾️यरेनियम या किरणोत्सारी असलेल्या मूलद्रव्याचा ऱ्हास होत असताना हेलिअम तयार होते. वातावरणात अत्यल्प प्रमाणात असल्याने वातावरणातून हेलिअम मोठय़ा प्रमाणात मिळविणे फार खर्चीक आहे त्यामुळे नैसर्गिक वायूंच्या साठय़ातून मिळत असलेला हेलिअम साठवला जातो. लष्करी आणि अन्य प्रकारच्या फुग्यांमध्ये वापर होत असल्याने, भविष्यातील वापराच्या दृष्टीने यू.एस.ए.मधील टेक्सास येथे हेलिअम तयार करून साठवला जातो.


🅾️रॉकेट्समध्ये इंधन म्हणून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर – निष्क्रिय आणि न जळणारा असल्याने – हेलिअमचा उपयोग केला जातो. तांबे, अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम यांची संमिश्रे जी उष्णतेचे सुवाहक आहेत 

No comments:

Post a Comment

Latest post

Combine Group B पूर्व 2 Feb च्या दृष्टीकोनातून ....

1. जे अगोदरपासून अभ्यासले आहे तेच पुस्तक (घटक/उपघटक) पुन्हा पुन्हा revise करा. 2. इथून पुढे 2 Feb पर्यंत अभ्यास Selective पाहिजे...(focus p...