🌧निसर्गाच्या लहरीपणाचे शेतीवर विपरित परिणाम होतात. कित्येकदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान कमी करता येऊ शकतं. ही अडचण हेरून अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेतून भारतात परतलेले डॉ. पराग नार्वेकर यांच्या सोबतीने सह्याद्री फार्मसने शेतकऱ्यांना परवडतील, असे अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केले आहे.
🌧तयाची उपयोग लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांचा ही केंद्र बसविण्याकडे कल वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० केंद्र कार्यान्वित झाली असून, ४०० शेतकऱ्यांनी यासाठी मागणी नोंदविली आहे.
🌧अमेरिकेच्या नासा संस्थेत उपग्रह आणि शेतीतील सेन्सर आधारित तंत्रज्ञान यावर संशोधन करणारे पराग नार्वेकर हे आता भारतीय शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत. सेंन्सरटिक्स या कंपनीचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांच्या संकल्पनेला स‘ह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचं पाठबळ मिळालं. माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीक विमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांची माहिती उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, अचूक करण्यास मदत मिळणार आहे. सह्याद्रीने एका खासगी कंपनीसोबत करार करून शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्रं उभारणी, संगणकीय प्रणाली विकसित करणे व त्याआधारे सल्ला, मार्गदर्शन असा उपक्रम सुरू केला.
🌧अत्याधुनिक प्रणालीद्वारे काटेकोर शेतीवर लक्ष दिले गेले. याद्वारे उत्पादन खर्च कमी करून प्रभावी व अचूक शेती व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण उत्पादन साध्य करता येते. नंतर सह्याद्री कंपनीने एक पाऊल पुढे टाकत स्वत:ची सहयोगी कंपनी सुरू केली.
No comments:
Post a Comment