Monday, 12 July 2021

भारत-नेपाळ रेल सेवा करार



🔰नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे.


🔰या करारामुळे दोनही देशांमधील सर्व अधिकृत मालवाहू रेलगाडी संचालकांना नेपाळमधून भारतात तसेच भारतातून नेपाळकडे आणि भारताकडून इतर तिसऱ्या देशावाटे नेपाळकडे मालवाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे जाळ्याचा वापर करण्यास परवानगी मिळते.


💢नपाळ देश


🔰नपाळ हा भारत व चीन (तिबेट) या दोन राष्ट्रांदरम्यान, हिमालयाच्या दक्षिण उतारावर वसलेला एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे. याच्या उत्तरेस चीन (तिबेट) आणि पूर्वेस सिक्कीम व पश्चिम बंगाल, दक्षिणेस बिहार व उत्तर प्रदेश आणि पश्चिमेस उत्तर प्रदेश ही भारताची राज्ये असल्यामुळे हा देश संपूर्णतः भूवेष्टित आहे. देशाची राजधानी काठमांडू हे शहर आहे. नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.


💢भारतीय रेल्वे विषयी


🔰भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.


🔰भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.


🔰भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले गेले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...