०९ जुलै २०२१

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे आठ जण.



🎙पतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले असून या चार मंत्र्यांमुळे राज्याला मिळालेल्या मंत्रीपदाची संख्या आठ झाली आहे.  माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर व अकोल्याचे खासदार व शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांची मात्र वगळण्यात आले आहे.


🎙महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (रस्तेबांधणी व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री), पियुष गोयल (रेल्वेमंत्री व उद्य्ोगमंत्री) व ग्राहक संरक्षण व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे या तिघांचे मंत्रीपद कायम राहिले आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एकमेव घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.


🎙कद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेत डॉ. भारती पवार या राज्यातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला मंत्री आहेत. नारायण राणे यांच्यामुळे मराठा, कपिल पाटील यांच्यामुळे आगरी, भागवत कराड यांच्यामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...