Tuesday, 13 June 2023

हायड्रोजन



🅾️उदजन म्हणजेच हायड्रोजन (अणुक्रमांक: १) हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. रसायनशास्त्रात उदजन H ह्‍या चिन्हाने दर्शवितात.

सामान्य तापमानाला आणि दाबाला उदजन वायुरूपात असतो. उदजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना उदजनचे रेणू प्रत्येकी २ अणूंनी बनलेले असतात.


🅾️ह सर्वांत हलके मूलद्रव्य आहे. उदजन हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन उदजनचे आहे.विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे उदजन हेच मूलद्रव्य प्लाज्मा ह्‍या स्वरूपात सापडते. पृथ्वीवर उदजन क्वचित मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. उदजनचे औद्योगिकरीत्या 

उत्पादन मिथेनसारख्या कर्बोदकपासून केले जाते. बहूतकरून या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या उदजनचा वापर संरक्षित पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा उदजनचा वापर मुख्यत्वे खनिज-इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी  व अमोनियाच्या उत्पादनासाठी केला जातो. 


🧩H2 चा शोध


🅾️H2 स्वरूपातील उदजन वायू पॅरासेल्सस (इ.स. १४९३ - इ.स. १५४१) ह्या स्विस अल्केमिस्टने प्रथम तयार केला. 


🅾️तयाने धातू आणि तीव्र आम्ल ह्यांच्या प्रक्रयेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला त्या वेळेस उदजन हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे ह्याची कल्पना नव्हती. इ.स. १६७१ मध्ये रॉबर्ट बॉइल ह्या आयरिश रसायनशास्त्रज्ञाने उदजनचा पुन्हा शोध लावला व सौम्य आम्ल आणि लोखंडाच्या चूर्णाच्या प्रक्रियेतून उदजन वायूच्या उत्पादनाचा तपशील दिला. इ.स. १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने उदजनला एक स्वतंत्र पदार्थ म्हणून मान्यता दिली. धातू आणि आम्ल यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या या वायूस त्याने "ज्वलनशील हवा" असे नाव दिले आणि ह्या वायूच्या ज्वलनातून पाणी तयार होते हे त्याने शोधले. अर्थात त्याने उदजन हा आम्लामधून मुक्त झालेला नसून पाऱ्यामधून मुक्त झालेला घटक आहे असा चुकीचा निष्कर्ष काढला. पण उदजनच्या अनेक कळीच्या गुणधर्मांचे त्याने अचूक वर्णन दिले. असे असले तरी, मूलद्रव्य म्हणून उदजनचा शोध लावण्याचे श्रेय सर्वसाधारणपणे त्यालाच दिले जाते. इ.स. १७८३ मध्ये आंत्वॉन लवॉसिए ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते, म्हणून त्या वायूला उदजन असे नाव दिले.


🅾️सरुवातीस उदजनचा उपयोग मुख्यत्वे फुगे आणि हवाई जहाजे बनवण्यासाठी होत असे. H2 हा वायू सल्फ्यूरिक आम्ल आणि लोह ह्यांच्या प्रक्रियेतून मिळवला जात असे. हिंडेनबर्ग हवाईजहाजातही H2 वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला. नंतर H2च्या ऐवजी हवाई जहाजांमध्ये आणि फुग्यांमध्ये हळूहळू हेलियम हा उदासीन वायू वापरण्यास सुरुवात झाली.


🧩उपयोग


🅾️उदजन हे खनिज तेलापेक्षा ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत सर्वात कार्यक्षम इंधन ठरते. पेट्रोल दर लिटरमध्ये ४२००० बी. टी. यु.(ब्रिटिश थर्मल युनिट) तर द्रव उदजन दर लिटरला १,३४,५०० बी. टी. यु. एवढी उष्णता निर्माण करतो. परंतु याच्या निर्मितीचा खर्च परवडत नसल्यामुळे उदजन हे प्रचलित साधन होण्यात अडचण येत आहे.


🧩नामकरण


🅾️हायड्रोजनच्या नावाची उत्पत्ती प्राचीन ग्रीक भाषेतील हायडॉर (ग्रीक: ὕδωρ (हीद्र)) म्हणजे पाणी, तर जेनेस म्हणजे तयार करणे या शब्दांच्या संयोगातून झाली आहे. हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार होते म्हणून 'पाणी तयार करणारा' अर्थात 'हायड्रोजन' असे त्याचे नामकरण 'आंत्वॉन लवॉसिए' ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने केले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...