०८ जुलै २०२१

मेरी कोम, मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक



🔰महान बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे टोक्यो ऑलिम्पिकच्या  उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असतील. ८ ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी बजरंग पुनिया याच्याकडे ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


🔰भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) टोक्यो स्पर्धा संयोजन समितीशी चर्चा करून ध्वजवाहकांची निवड केली आहे. लैंगिक समानतेला महत्त्व देत भारताने पुरुष आणि महिलांमधून प्रत्येकी एक असे दोन ध्वजवाहक निवडण्याचे ठरवले होते.


🔰‘‘ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याने माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस म्हणता येईल. भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याचा अभिमान वाटत आहे. याबद्दल मी क्रीडा मंत्रालय आणि ‘आयओए’ची ऋणी आहे. यामुळे मला प्रेरणा मिळाली असून देशाला पदक मिळवून देण्याचे आश्वासन मी देते,’’ असे सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या मेरी कोमने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...