Saturday, 24 July 2021

सोमवारनंतर पायउतार होण्याचे येडियुरप्पांचे संकेत


🔰कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याच्या अनेक आठवड्यांच्या अटकळींनंतर, २६ जुलैनंतर पायउतार होण्याचे संकेत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी दिले.


🔰‘पुढील घडामोडीबाबत मला २५ जुलैनंतरच कळेल आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे मी पालन करीन. पक्ष बळकट करण्यासाठी आपण कर्नाटकात पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी मी काम करीन,’ असे मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत आतापर्यंत ठाम राहिलेले येडियुरप्पा यांनी बेंगळूरुत पत्रकारांना सांगितले.


🔰यापूर्वी ठरलेल्या कार्यक्रमानुसार, मुख्यमंत्री २६ जुलैला विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहणार होते आणि त्याच्या आदल्या दिवशी, २५ जुलैला आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करणार होते, मात्र आता या कार्यक्रमांत बदल करण्यात आला आहे.


🔰यडियुरप्पा यांचे सरकार २६ जुलैला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, त्या दिवशी ते राजीनामा देऊ शकतात अशा अटकळी होत्या. असे झाल्यास भाजपच्या आणखी एका मुख्यमंत्र्याला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होईल.

मंगळवार व बुधवारी निरनिराळ्या मठांच्या साधूंनी येडियुरप्पा यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेऊन त्यांना त्यांचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करण्याचे आवाहन केले.


🔰यडियुरप्पा यांना हटवण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्याही हालचालीविरुद्ध त्यांचे समर्थक उघडपणे बोलू लागल्यानंतर, येडियुरप्पा यांनी बुधवारी पक्षाबाबत आपली निष्ठा पुन्हा व्यक्त करण्यासाठी बुधवारी ट्विटरवर एक निवेदन जारी केले. पक्षाला अडचणीचा ठरेल असा कुठलाही विरोध किंवा बेशिस्त कुणीही दर्शवू नये असे आवाहन मी करतो, असे त्यांनी यात सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...