Monday, 5 July 2021

आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अतंर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग उन्नती योजनेला एक वर्ष पूर्ण



🌻अन्न प्रक्रीया उद्योगातील असंघटित गटात सध्या व्यक्तिगत पातळीवर कार्यरत सूक्ष्‍म उद्योगात स्पर्धा वाढवणे आणि या क्षेत्राला प्रोत्‍साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून आत्‍मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत केंद्र-पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्‍म अन्न उद्योग उन्‍नती योजनेने (PMFME) एक वर्ष पूर्ण केले आहे.


योजनेची कामगिरी


🌻योजनेच्या ‘एक जिल्हा एक उत्‍पादन’ (ODOP) घटकाच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने राज्‍ये/ केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्राप्‍त शिफारशीनुसार 137 वैशिष्ट्यपूर्ण उत्‍पादनांसह 35 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतील 707 जिल्ह्यांकरीता ODOPला मंजूरी दिली आहे.


🌻योजनेच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने ग्राम विकास मंत्रालय, आदिवासी कार्य मंत्रालय आणि गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांच्यासोबत तीन संयुक्‍त पत्रांवर स्वाक्षरी केली आहे.


🌻योजनेच्या नोडल बँकेच्या रुपात यूनियन बँक ऑफ इंडिया सोबत एक करार केला आहे. 11 बँकासह योजनेकरीता आधिकृत कर्ज घेणाऱ्या भागीदारांच्या रुपात करारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


🌻योजनेच्या अतंर्गत, क्षमता बांधणी घटकाखाली, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM) आणि अन्न प्रक्रीया तंत्रज्ञान संस्था (IIFPT) प्रशिक्षण तसेच संशोधन विषयक सहकार्यात मोलाची भूमिका वठवत आहेत.


🌻 तयाअंतर्गत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 371 तज्ञ प्रशिक्षणार्थीं आणि 469 जिल्हा पातळीवरील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण घेले असून इतर राज्यात ही प्रक्रीया सुरु आहे.


🌻अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने IIFPT संस्थेच्या सहयोगाने समान अंत:पोषण केन्द्रांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल आणि देशभरात अंत:पोषण केन्द्राच्या तपशीलाच्या सुविधेसाठी एक ऑनलाइन समान अंत:पोषण केंद्र नकाशा विकसित केला आहे.


🌻योजनेच्या अंतर्गत बचत गटांना बीज भांडवल उपलब्ध केले जाते. त्यासाठी राज्य पातळीवर कार्यरत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) आणि राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (SRLMs) सहकार्य घेतले जाते.


🌻 आतापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने राज्य नोडल संस्थेला (SNA) 43,086 बचतगट सदस्यांना 123.54 कोटी रुपये भांडवल देण्याची शिफारस केली आहे. राज्य नोडल संस्थेने 8040 सदस्यांना बीज भांडवल मंजूर केले असून 25.25 कोटी रुपयांचे वाटप SRLMला झाले आहे.


🌻परत्येकी 10 उत्पादनांच्या विपणन आणि नाममुद्रा प्रचारासाठी NAFED आणि TRIFED या संस्थांच्यासोबत योजनेच्या अतंर्गत सामंजस्य करार केला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...