Thursday, 1 July 2021

चीनची पहिली ‘बुलेट ट्रेन’ भारतीय सीमेलगत सुरू


🔰तिबेट या हिमालयातील भागात चीनने  शुक्रवारी संपूर्णपणे विजेवर चालणारी बुलेट ट्रेन सुरू केली असून ती राजधानी ल्हासा व न्यायिंगची यांना जोडणारी आहे. अरुणाचल प्रदेश लगत असलेल्या एका शहराजवळून ही रेल्वे जाते.


🔰लहासा- न्यायिंगची यांना जोडणारा शिचुआन-तिबेट रेल्वेमार्ग तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन १ जुलैला चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीनिमित्त होणार आहे.  तिबेट स्वायत्त प्रदेशात विद्युत बुलेट ट्रेन शुक्रवारी सकाळी सुरू झाली असून तिचा वेग ताशी १६० कि.मी आहे.


🔰एकेरी मार्गावरून ही रेल्वे धावणार असून ती  ल्हासा, शन्नान, न्यायिंगची यासह नऊ स्थानकांवर थांबेल. प्रवासी व मालवाहतूक त्यातून केली जाणार असून रस्ता मार्गापेक्षा ल्हासा- न्यायिंगची अंतर ५ तासांवरून ३.५ तासांवर येणार आहे. शन्नान व न्यायिंगची यांच्यातील प्रवासाचा काळ ६ तासांवरून दोन तासांवर येणार आहे.

No comments:

Post a Comment