Thursday, 8 July 2021

भारत सरकारचे नवीन 'सहकार मंत्रालय'.



🔰'सहकारातून समृद्धी' हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी, भारत सरकारने पूर्णपणे वेगळ्या 'सहकार मंत्रालयाची' स्थापना करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.


🔰सहकारी संस्थांसाठी 'व्यवसाय सुलभीकरण' प्रक्रिया सुरळीत करण्याचे आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम, सहकार मंत्रालयाद्वारे होऊ शकेल.


🔰दशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी हे मंत्रालय एक प्रशासकीय, वैधानिक आणि धोरणात्मक चौकट नव्याने निर्माण करू शकेल. त्यामुळे सहकारी संस्थांची मुळे घट्ट रुजून सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने जनाधार मिळू शकेल.


🅾️‘सहकार’ या संज्ञेची व्याख्या...


🔰मानवप्राणी जातीतील समूहजीवन जगण्याची उपजत असणारी सहजप्रवृत्ती तसेच पारस्परिक सहकार्य करण्याची पद्धत म्हणजे सहकार होय. तांत्रिकदृष्टया सहकार म्हणजे विशेष पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रकार होय. सहकार हा को-ऑपरेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी पारिभाषिक शब्द आहे.


🔰रॉबर्ट ओएन हे आधुनिक सहकारी चळवळीचे जनक होय. वयाच्या एकविसाव्या वर्षी स्कॉटलंडमधील गिरणीत ते भागीदार बनले. अमेरिकेतील इंडियाना येथे त्याने ‘ न्यू हार्मनी कॉलनी’ ही सहकारी वसाहत स्थापन केली. 


🔰गरेट ब्रिटनमधील रॉचडेल या सुती कापड गिरण्यांच्या छोटया गावातील 28 कामगारांनी 21 डिसेंबर 1844 रोजी इक्विटेबल पायोनिअर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या सहकारी भांडाराची स्थापना केली. त्यांनी स्वीकारलेली तत्त्वे सहकार चळवळीला मार्गदर्शक ठरली. सहकारी चळवळीतील उपक्रम सहकारी पद्धतीने, स्वेच्छेने व लोकशाही पद्धतीने चालविले जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...