🔰राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कार्यकालातील चार वर्षे पूर्ण केली असून त्यांनी आतापर्यंत ६३ विधेयकांना मान्यता दिली आहे. त्यांनी करोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या करोना योद्ध्यांचे कौतुक केले होते. कोविंद हे ७६ वर्षांचे असून त्यांचा शपथविधी २५ जुलै २०१७ रोजी झाला होता.
🔰राष्ट्रपती भवनने म्हटले आहे की, ते पदाची चार वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या कामांची इ पुस्तिकाही यावेळी जारी करण्यात आली आहे. कोविंद यांनी १३ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली असून ७८० लोकांची भेट वेगवेगळ्या निमित्ताने घेतली आहे. राज्यघटनेचे रक्षणकर्ते म्हणूनही त्यांनी भूमिका पार पाडली. केंद्र सरकारची ४३ व राज्य सरकारांची २० विधेयके त्यांनी मंजूर केली आहेत.
🔰करोना योद्ध्यांना स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती भवनात बोलावून त्यांचा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करीत त्यांचे धैर्य व समर्पण याला मोलाची साथ दिली होती असे इ पुस्तिकेत म्हटले आहेत. परिचारिका संघटना, लष्करी परिचर संघटना, राष्ट्रपती आस्थापना दवाखाना परिचर यांच्यासमवेत त्यांनी रक्षाबंधन साजरे केले होते.
🔰एकूण २३ परदेशी राजदूतांची अधिकारपत्रे त्यांनी स्वीकारली तसेच अनेकदा राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. कर्नाटकातील जनरल थिमय्या म्युझियमचे उद्घाटन त्यांनी केले होते. अंदमान निकोबार कमांडच्या स्वराज दीप संचलनाची सलामी त्यांनी स्वीकारली होती.
No comments:
Post a Comment