🎯पश्चिम बंगालच्या विधानसभेत संविधानातील कलम 169 अन्वये राज्यात विधानपरिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
♟बगाल विधानपरिषदेची रचना...
🎯बगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. विधानपरिषदेची स्थापना झाल्यावर विधानपरिषदेत एकूण 98 सदस्य असतील. भारतीय संविधानानुसार विधानसभेच्या जागेच्या एक तृतियांश जागांपेक्षा विधानपरिषदेच्या जागा अधिक असता कामा नये.
🎯राज्यातील विधानसभेने विशेष बहुमताने विधानपरिषदेच्या संदर्भात कोणताही ठराव संमत केल्यास भारतीय संविधानातील कलम 169 अन्वये संसद कायद्याने राज्यातील द्वितीय सभागृह बनवू किंवा रद्द करू शकते.
♟इतिहास...
🎯पश्चिम बंगालमध्ये पाच दशकांपूर्वी विधानपरिषदेची व्यवस्था होती. नंतर विधानपरिषद विसर्जित करण्यात आली. 21 मार्च 1969 रोजी 51 सदस्य असलेली विधानपरिषद विसर्जित करण्यात आली होती.
🎯वर्तमानात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहेत.
♟विधानसभा आणि विधानपरिषद...
🎯भारत सरकारच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या घटकराज्याच्या प्रमुखपदी राज्यपाल असतात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ती नेमणूक रद्द होऊ शकते. राज्यपाल हे जरी राज्याचा घटनात्मक प्रमुख असले, तरी ते केंद्रीय सरकारचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात संविधानाप्रमाणे राज्य चालते किंवा नाही हे ते पाहतात आणि तसे नसल्यास राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करतात.
No comments:
Post a Comment