Thursday, 1 July 2021

गगनयान मोहीम डिसेंबरमध्ये



🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मानवरहित गगनयान डिसेंबरमध्ये अवकाशात झेपावणार आहे. मानवी अवकाश मोहिमेची ही पूर्वतयारी असून कोविड १९ टाळेबंदीमुळे ही अवकाश मोहिम मागे पडत चालली होती, त्याला आता गती देण्यात येत आहे.


🔰टाळेबंदीमुळे अवकाशयानासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची वाहतूक विस्कळीत झाली होती. गगनयान योजनेत एकूण दोन मानवरहित उड्डाणे होणार असून नंतर भारतीय व्यक्तींना अवकाशाची सफर करण्याची संधी मिळणार आहे. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने या मोहिमेला मोठा फटका दिल्याचे बेंगळुरूत मुख्यालय असलेल्या इस्रो या संस्थेने म्हटले आहे.


🔰अवकाशयानासाठी लागणारी यंत्रसामग्री देशाच्या विविध भागातून गोळा करण्यात येत होती, पण कोविड टाळेबंदीमुळे त्यावर विपरित परिणाम झाला होता. यानाची रचना, विश्लेषण व दस्तावेजीकरण इस्रोने केले असून  यंत्रसामग्री देशी उद्योग पुरवित आहेत.


🔰कद्रीय अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी फेब्रुवारीत  म्हटले होते, की यावर्षी डिसेंबरमध्ये  पहिले मानवरहित अवकाशयान उड्डाण करेल. दुसरे मानवरहित यान २०२२-२३ मध्ये उड्डाण करील व त्यानंतर मानवी अवकाश मोहीम होईल.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...