Friday, 9 July 2021

राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर.



🔰शक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे आवश्यक असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी देखील आवश्यक असणार आहे.


🔰यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकात म्हटले आहे की, १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनी ठराव करून खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


🔰गरामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...