Friday, 30 July 2021

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक



‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज जन्मदिवस. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊ सविस्तर...


*टिळकांचा जीवनप्रवास :*


▪️ लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला. स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. 


▪️ पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र 19 व्या वर्षी निवर्तले. 


▪️ 16 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न 17व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. 


▪️ 1876 साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली.


▪️ महाविद्यालामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राची मैत्री जमली. दोघेही एका विचाराची मने घेऊनी चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य हे झाले पाहिजे. 


▪️ आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. 


▪️ दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच 2 जानेवारी 1880 ला पुणमध्ये नू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले. 


▪️ ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलने हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले. 


▪️ टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले. 


▪️ आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.


*टिळकांचं महत्वपुर्ण कार्य :*


▪️ 1880 साली पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुलची स्थापना

▪️ 1881 साली जनजागृतीकरता ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्र सुरू

▪️ 1884 साली पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 

▪️ 1885 साली पुणे येथेच फग्र्युसन काॅलेज सुरू केले

▪️ ’सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ’शिव जयंती’ उत्सवाला सुरूवात 

▪️ 1897 राजद्रोहाचा आरोप लावुन टिळकांना दिड वर्षांची कैद 

▪️ 1916 साली ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना 

▪️ टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हंटले गेले

▪️ टिळक ’लाल बाल पाल’ या त्रिमूर्तीमधील एक


दरम्यान, 1 आॅगस्ट 1920 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...