Sunday, 11 July 2021

ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी.



🖲टोक्योमधील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकसाठी स्टेडियमवरील प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे, असे ऑलिम्पिकमंत्री तामायो मारूकावा यांनी सांगितले.


🖲सध्याची आणीबाणी रविवारी संपल्यानंतर लगेच सोमवारपासून लागू होणारी आणीबाणी २२ ऑगस्टपर्यंत लागू असेल. त्यामुळे ऑलिम्पिकचा २३ जुलैला होणारा उद्घाटन सोहळा आणि ८ ऑगस्टचा समारोप सोहळा यांच्यापुढे आणीबाणीचे आव्हान असेल. दूरचित्रवाणीनुरूप ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांवर बंदी असेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद (आयओसी) आणि ऑलिम्पिक संयोजन समितीने जाहीर केले.


🖲‘‘करोनाच्या डेल्टा उत्परिवर्तनाचा धोका लक्षात घेऊन महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियमला हजर राहता येण्याची शक्यता कमी आहे,’’ असे पंतप्रधानांनी आणीबाणी जाहीर करताना म्हटले होते. आणीबाणीच्या कालावधीत मद्यपींचा वावर असलेले बार, रेस्टॉरंट आणि कराओके पार्लर्सवर बंदी घालण्यात आली आहे. टोक्योमधील रहिवाशांकडून घरी थांबून दूरचित्रवाणीवर ऑलिम्पिकचा आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे. गुरुवारी टोक्यो शहरात ८९६ करोनारुग्णांची नोंद झाली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...