Thursday, 22 July 2021

ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक उपकरण IIT रोपार या संस्थेत विकसित .



🔥वद्यकीय ऑक्सिजनच्या सिलिंडरचे आयुष्य तीन पटीने वाढविण्याच्या दृष्टीने, ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक नवीन उपकरण रोपार (पंजाब) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी विकसित केले आहे.


🔥सस्थेतील जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. आशिष सहानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण तयार करण्यात आले.


🦋ठळक बाबी..


🔥रग्णांना श्वास घेताना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवणारे आणि उश्वासाद्वारे कार्बन डाय-ऑक्साईड बाहेर सोडत असताना ऑक्सिजन पुरवठा रोखणारे हे नवीन उपकरण ऑक्सिजनची बचत करण्यात मदत करते.


🔥आतापर्यंत, श्वासोच्छ्वासाच्या दरम्यान, ऑक्सिजन सिलेंडर / पाईपमधील ऑक्सिजन वापरकरता श्वास सोडत असताना कार्बन डाय-ऑक्साईड सोबत बाहेर ढकलला जात असे. त्यामुळे दीर्घ कालावधीत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा अपव्यय होत असे. नवीन उपकरणामुळे ऑक्सिजनचा अपव्यय टाळता येतो.


🔥AMLEX सहजपणे ऑक्सिजन पुरवठ्याची लाइन आणि रूग्णाच्या तोंडावरील मास्क याच्याशी जोडले जाऊ शकते. त्यात सेन्सरचा वापर करण्यात आला असून तो सेन्सर कोणत्याही पर्यावरणीय स्थितीत वापरकर्त्याचा श्वास आणि उच्छ्वास यातील फरक यशस्वीरित्या ओळखू शकते. हे साधन व्यावसायिकरित्या उपलब्ध कोणत्याही ऑक्सिजन थेरपी आणि मास्क यांच्या बरोबर कार्य करू शकते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...