१९ जुलै २०२१

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्यावतीने प्रस्तावित ‘ड्रोन नियम 2021’



🔰नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी ‘ड्रोन नियम मसुदा 2021’ प्रसिद्ध केला आहे. विश्वासपूर्ण, स्वयं-प्रमाणीकरण आणि विना-हस्तक्षेप देखरेखीवर आधारित ‘ड्रोन नियम 2021’ हे 12 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘UAS नियम 2021’ याची जागा घेतील.


🔰आवश्यक अर्जांची संख्या 25 वरून 6 एवढी कमी झाली. ड्रोनचा आकार लक्षात न घेता शुल्क नाममात्र असणार. 


🔰एक व्यवसाय-अनुकूल एकल-विंडो ऑनलाइन प्रणाली म्हणून ‘डिजिटल स्काय मंच’ विकसित केला जाईल. डिजिटल स्काय मंचावर कमीतकमी मानवी संवाद असेल आणि बर्‍याच परवानग्या स्वघोषित असणार आहेत. डिजिटल स्काय मंचावर ‘ग्रीन’, ‘यलो’ आणि ‘रेड’ क्षेत्रांसह परस्पर संवादात्मक नकाशा प्रदर्शित केला जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...