Thursday, 22 July 2021

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे


प्रश्न71) भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) हे ___ याच्या अखत्यारीत कार्य करते.

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


प्रश्न72) कोणत्या भारतीय राज्याने येत्या तीन वर्षात ‘ॲगार’च्या लागवडीपासून 2000 कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे?

उत्तर :-  त्रिपुरा


प्रश्न73) ‘अर्थ नेटवर्क’ या संस्थेच्या ‘2020 इंडिया लाइटनिंग रिपोर्ट’ या अहवालानुसार, कोणते राज्य सर्वाधिक वीजा पडल्याची नोंद करण्यात आलेल्या पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे?

उत्तर :- आंध्र प्रदेश व कर्नाटक


प्रश्न74) कोणत्या कंपनीला भारतात मोटार इंधन विक्री करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली?

उत्तर :-  रिलायन्स इंडस्ट्रीज,आरबीएमएल सोल्युशन्स, मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज


प्रश्न75) एका बातमीनुसार, ‘झुरोंग’ रोव्हरने आतापर्यंत _ ग्रहाच्या पृष्ठभागावर 509 मीटर एवढ्या अंतरचा प्रवास पूर्ण केला आहे.

उत्तर :- मंगळ


प्रश्न76) ‘हिंदु विवाह कायदा-1955’ यामधील कोणते कलम ‘दांपत्य अधिकारांचे प्रत्यास्थापन’ या मुद्याच्या संदर्भात आहे?

उत्तर :- कलम 9


प्रश्न77) खालीलपैकी कोणते विधान “मूब वोबल’ (MOON WOBBLE) याची व्याख्या स्पष्ट करते?

उत्तर :- दर 18.6 वर्षांनी चंद्राच्या कक्षामध्ये होणारे चक्रीय स्थलांतर


प्रश्न78) कोणत्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचा वापर करणारे ‘एनबीड्रायव्हर / NBDriver’ (नेबरहूड ड्राइव्हर) नामक एक डिजिटल साधन तयार केले?

उत्तर :- IIT मद्रास


प्रश्न79) कोणत्या शहरात ‘भारतीय वारसा संस्था (अर्थात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हेरिटेज)’ याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?

उत्तर :- नोएडा


प्रश्न80) कोणत्या देशाने सागरी सुरक्षेच्या संदर्भात ‘TTX-2021’ या आभासी त्रिपक्षीय बैठकीचे आयोजन केले?

उत्तर :- भारत,श्रीलंका,मालदीव


प्रश्न81) कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिवस” साजरा करतात?

उत्तर :-  20 जुलै


प्रश्न82) कोणत्या व्यक्तीची पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली?

उत्तर :- पेद्रो कॅस्टिलो


प्रश्न83) कोणते राज्य ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक कागदपत्रे वितरित करणारे देशातील पहिले राज्य ठरले?

उत्तर :- महाराष्ट्र


प्रश्न84) कोणत्या गावात गुजरातमधील बालिका पंचायतची पहिली निवडणूक यशस्वीरित्या पार पडली?

उत्तर :- कुनारिया खेडे ( गुजरात )


प्रश्न85) ____ अंतर्गत, केंद्रीय सरकारने 6 पारंपारिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या तयार करण्यासाठी 50,000 कोटी रुपयांची निविदा काढली आहे.

उत्तर :- प्रोजेक्ट 75-इंडिया


प्रश्न86) आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज कमी करीत _ एवढा वर्तविला आहे.

उत्तर :- 10 टक्के


प्रश्न87) कोणत्या शहरात IOC कंपनी भारताचा पहिला ‘ग्रीन हायड्रोजन’ प्रकल्प उभारणार आहे?

उत्तर :-  मथुरा


प्रश्न88) खालीलपैकी कोणते ‘नौकानयनासाठी सागरी साधने विधेयक-2021’ याचे उद्दीष्ट आहे?

उत्तर :-  ‘भारतीय बंदरे कायदा-1908’ रद्द करण्यासाठी


प्रश्न89) 20 जुलै 2021 रोजी _ देशाने घोषणा केली की, त्याने ‘एस-500’ नामक नवीन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी यशस्वीपणे पार पाडली.

उत्तर :- रशिया


प्रश्न90) कोणत्या देशाने 16 जुलै 2021 रोजी पहिले दोन MH-60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला सुपूर्द केलेत?

उत्तर :- अमेरिका

No comments:

Post a Comment