Tuesday, 22 June 2021

SDG इंडिया निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2020-21.



♒️नीती आयोगाने (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) 3 जून 2021 रोजी भारताच्या शाश्वत विकास ध्येये (SDG) निर्देशांकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली.


🅾️ठळक बाबी....


♒️नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी 'SDG इंडिया इंडेक्स अँड डॅशबोर्ड 2020–21: पार्टनरशिप्स इन द डिकेड ऑफ अॅक्शन' या शीर्षकाच्या अहवालाचे प्रकाशन केले.

तिसर्‍या आवृत्तीत 17 ध्येये, 70 लक्ष्ये आणि 115 निर्देशांकाचा समावेश आहे.


🅾️निष्कर्ष...


♒️2019 साली दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेश आघाडीच्या श्रेणीतली (दोनहीसह 65-99 दरम्यान गुण) आहेत. 2020-21 या वर्षात आणखी बारा राज्ये / केंद्रशासित प्रदेश या श्रेणीत येत आहेत. उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब, हरयाणा, त्रिपुरा, दिल्ली, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, जम्मू व काश्मीर आणि लडाख यांनी (दोनहीसह 65 आणि 99 दरम्यान गुण) आघाडीच्या श्रेणीत स्थान पटकावले आहे.


♒️दशाच्या एकूण SDG गुणात 6 अंकांनी सुधारणा होऊन हे गुण वर्ष 2019 मधील 60 वरून 2020-21 या वर्षात 66 वर पोहोचले आहे.


♒️करळ राज्य एकूण 100 गुणांपैकी 75 गुण मिळवून SDG प्राप्त करण्यासंबंधीच्या प्रगतीमध्ये अग्रेसर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.


♒️झारखंड, बिहार आणि आसाम या राज्यांनी याबाबतीत सर्वात कमकुवत कामगिरी केली आहे.


🅾️पार्श्वभूमी...


♒️डिसेंबर 2018 या महिन्यात प्रथम प्रकाशित करण्यात आलेला हा निर्देशांक देशातील शाश्वत विकास ध्येयांसंबंधी प्रगतीवर लक्ष ठेवण्याचे प्राथमिक साधन बनले आहे आणि त्याचबरोबर जागतिक उद्दिष्टांवर मानांकने प्रदान करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धेला चालना दिली आहे.


♒️2030 SDG कार्यसूची साध्य करण्याच्या प्रवासाचा एक तृतीयांश प्रवास भारताने पूर्ण केला असून निर्देशांकाच्या अहवालाची ही आवृत्ती भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करते.


🅾️शाश्वत विकास ध्येये (SDGs) विषयी...


♒️2015 सालासाठी ठरविण्यात आलेली सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यांपासून 2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित झाली आहेत. 2000 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्त्राब्द (मिलेनियम) शिखर परिषदेनी ठरविलेल्या 2015 सालासाठीच्या सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यामध्ये 18 लक्ष्यांसह आठ आंतरराष्ट्रीय विकास ध्येयांची एक सूची होती. हा जगभरातल्या आव्हानांना सोडविण्यासाठी केला गेलेला प्रथम आणि एकमात्र वैश्विक प्रयत्न होता.


♒️शाश्वत विकास ध्येये (SDGs) ही 17 ध्येये, 169 लक्ष्ये आणि 306 राष्ट्रीय निर्देशकांची एक सार्वत्रिक सूची आहे, जे मानवी कल्याणासाठी 2030 सालापर्यंत कोणीही विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही या उद्देशाने मोठ्या यशासाठी विकासात्मक कृतींचे नियोजन करण्यास आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.


♒️सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या शिखर परिषदेत 193 सदस्य राष्ट्रांनी अंगिकारलेल्या आणि दि. 1 जानेवारी 2016 रोजी लागू झालेल्या “ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड: द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या पुढाकाराचा हा एक भाग आहे.


♒️सन 2030 साठीची शाश्वत विकास ध्येये (SDGs)....


ध्येय 1: दारिद्र्याचे संपूर्ण उच्चाटन

ध्येय 2: शून्य उपासमार (उपासमार थांबवणे, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषक आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे)

ध्येय 3: सर्वांसाठी निरोगी आरोग्य आणि सर्व वयोगटातील सर्वांसाठी कल्याणाचा प्रचार करणे

ध्येय 4: सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (सर्वसमावेशक आणि न्याय गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिक्षण संधींचा प्रचार करणे)

ध्येय 5: स्त्री-पुरुष समानता (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि सर्व महिला व मुलींना सशक्त करणे)

ध्येय 6: सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता

ध्येय 7: सर्वांसाठी स्वस्त, विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा

ध्येय 8: सर्वांसाठी सभ्य काम आणि आर्थिक वाढ (सतत, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, पूर्णकाळ आणि उत्पादनक्षम रोजगार तसेच सभ्य कामांना प्रोत्साहन देणे)

ध्येय 9: उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (लवचिक अश्या पायाभूत संरचना तयार करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे)

ध्येय 10: असमानता कमी करणे (देशांच्या आतमधील आणि देशांदरम्यान असलेली असमानता कमी करणे)

ध्येय 11: शाश्वत शहरे आणि मानवी वस्ती

ध्येय 12: शाश्वत उपभोग आणि उत्पादन

ध्येय 13: हवामानविषयक कार्य (हवामानातील बदल आणि त्यांचे परिणाम टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे)

ध्येय 14: जलजीवन (शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी स्त्रोतांचे संवर्धन आणि सातत्यपूर्ण वापर)

ध्येय 15: थल जीवन (जमिनीवर पर्यावरणविषयक व्यवस्थे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...