⏺भारतीय नौदलाची अण्वस्त्र हल्ले करू शकणारी ‘INS चक्र’ ही एकमेव पाणबुडी रशिया देशाकडे परत पाठविण्यात आली आहे.
⏺ही पाणबुडी 2012 साली रशियाकडून भाडेकरारवर घेण्यात आली होती. संपूर्णपणे रशियन बनावटीची असलेली ही पाणबुडी 10 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्यात आली होती. अण्वस्त्र क्षमता असलेली रशियाकडून घेण्यात आलेली ही भारताची दुसरी पाणबुडी होती.
☑️‘INS चक्र’ची वैशिष्ट्ये ...
⏺‘INS चक्र’ ही रशियाच्या बनावटीची अकुला श्रेणीची पाणबुडी आहे.
ही पाणबुडी पाण्याच्या पृष्ठभागावर न येता जवळपास 100 दिवस पाण्याखाली राहू शकते.
⏺या पाणबुडीत 1 हजार हॉर्सपॉवर एवढी ताकद असलेले इंजिन आहे, त्यामुळे ती ताशी 30 नॉटीकल मैल एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकते.‘INS चक्र’ चालवण्यासाठी साधारणतः 30 अधिकारी आणि त्यांच्या सोबत 70 हून अधिक सहाय्यकांची गरज लागते.
☑️भारतीय नौदलाविषयी...
⏺भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
⏺छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते. ‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली. त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.
⏺1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
No comments:
Post a Comment