Tuesday, 22 June 2021

अनुप चंद्र पांडे: भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) नवीन निवडणूक आयुक्त



🚨राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनुप चंद्र पांडे यांची भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निवडणूक आयुक्त या पदावर नियुक्ती केली. विधी व न्याय मंत्रालयाच्या विधी विभागाने 8 जून 2021 रोजी यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली.


🚨अनुप चंद्र पांडे ज्या दिवसापासून पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून ही नियुक्ती लागू राहील. ते उत्तरप्रदेश संवर्गाचे निवृत्त IAS अधिकारी आहेत.


🚨वर्तमानात, सुशील चंद्र हे 13 एप्रिल 2021 पासून भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर राजीव कुमार हे आयोगाचे एक निवडणूक आयुक्त आहेत.


⭕️भारतीय निवडणूक आयोग (ECI) विषयी


🚨भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.


⭕️घटनात्मक तरतुदी


🚨कलम 324: ही तरतूद आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी आहे. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.


🚨कलम 325: संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एक सार्वत्रिक निवडणूक होणार. धर्म, वंश, जात किंवा लैंगिकतेच्या आधारावर निवडणूक चालवली जाणार.


🚨कलम 326: लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांसाठी निवडणुकीच्या आधारावर प्रौढ मताधिकारांच्या संदर्भात आहे.


🚨कलम 327: निवडणुकीच्या संदर्भात प्राधान्य देण्यासाठी संसदेला अधिकार देते.


🚨कलम 328: निवडणुकीच्या संदर्भात कायदे तयार करण्याचे अधिकार राज्य विधानसभेला देते.


🚨कलम 329: निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप प्रतिबंधित करते.

संविधानानुसार, उमेदवाराला मनाई करण्यास आयोगाला शक्ती आहे, जर ती व्यक्ती निवडणुकीचा खर्च नोंदविण्यात अपयशी ठरणार.


⭕️आयोगाची संरचना आणि जबाबदारी


🚨आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.


🚨निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आचारसंहिता पाळणे प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी बंधनकारक असते. यालाच ‘आदर्श आचारसंहिता’ (Model Code of Conduct –MCC) म्हणून देखील ओळखले जाते. आदर्श आचारसंहिता हे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या आचरणासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारा तयार केलेली मार्गदर्शके आहेत.

No comments:

Post a Comment