Tuesday, 22 June 2021

विसा वूडसॅट उपग्रह: जगातील पहिला लाकडी उपग्रह.


🔰2021 वर्षाच्या अखेरपर्यंत, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ही संस्था पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत जगातील पहिला लाकडी उपग्रह पाठविणार आहे. तयार करण्यात आलेल्या “विसा वूडसॅट (WISA WOODSAT)” असे नाव देण्यात आले आहे.


🔰अतराळयानासाठी प्लायवुडसारख्या लाकडी साहित्याची उपयोगिता तपासण्यासाठी पाहिलांडाच असा प्रयोग केला जात आहे. उष्णता, थंडी, निर्वात आणि किरणोत्सर्ग अश्या भीषण परिस्थितीत लाकडी सामग्री कितपत टिकाव धरून ठेवू शकते याविषयीचा हा प्रयोग आहे.


🔴ठळक बाबी...


🔰जगातील पहिला लाकडी उपग्रह न्यूझीलँड देशातून रॉकेट लॅब कंपनीच्या ‘इलेक्ट्रॉन’ प्रक्षेपकाने अंतराळात सोडला जाणार आहे.


🔰हा उपग्रह 10 x 10 x 10 सें.मी. एवढ्या आकाराचा नॅनो श्रेणीतील उपग्रह आहे.

त्याची रचना आणि निर्मिती फिनलँड देशाच्या शास्त्रज्ञांनी केली.


🔰पलायवुडपासून बनविलेला उपग्रह पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत सुमारे 500-600 कि.मी. उंचीवर ठेवला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...